माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तडवळे येथील अमोल गिड्डे ची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. अमोल गिड्डे याचे प्राथमिक शिक्षण तडवळे येथे तर माध्यमिक शिक्षक बनपुरी हायस्कूल येथे झाले होते.
सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या अमोल गिड्डे याने जिद्दीने अभ्यास करत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. अमोल गिड्डे हा कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधनी, इस्लामपुर येथील प्रा. अजितकुमार पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. त्यांच्या निवडीनंतर तालुक्यातील विविध मान्यवरांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.