माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : रेश्मा राजगे : आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत आलेली बेंदूर सणाची परंपरा आज देखील उत्साहात पार पडली.
मुढेवाडी गावच्या परंपरेनुसार गावातील कोतवाल येऊन घरोघरी मोळ देऊन जातो व दुसऱ्या दिवशी येऊन आंब्याच्या पानाचे तोरण सुद्धा घराला बांधून जातो. त्याचबरोबर बळी राजा त्याच्या एपतीप्रमाने बैलांची सजावट करत असतो. बैलाला अंघोळ घालून त्याच्या खांद्याला तेल तूप लावून खांदमळनी केली जाते. मग त्यांच्या अंगाला लाल किंवा पिवळ्या रंगाने रंगवून नक्षीदार काढले जाते.
आजही त्याच परंपरेनुसार मुढेवाडी मध्ये बेंदूर सण साजरा करण्यात आला. गावामध्ये बैलांना वाजत गाजत नेऊन त्याची मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर गावामध्ये गजीढोलाचा कार्यकम ही पार पडला.