माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक होत असून, राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आटपाडी तालुका राष्ट्रवादी कोणाच्या पाठीमागे राहणार हे आज स्पष्ट होणार आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडात शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होत, उपुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली.
याच पार्शवभूमीवर आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक होत असून सदर ची बैठक ही आटपाडी येथील विश्रामधाम येथे संपन्न होणार आहे.