Latest Marathi News

BREAKING NEWS

 

नवरदेव बॅंडबाजासोबत वरात घेऊन आला! परंतु घराला लॉक करून नवरी फरार…

0 177

लग्नाच्या काही घटना अशा असतात ज्यांवर विश्वासच बसत नाही. अशीच एक विश्वास न बसणारी घटना समोर आली आहे. एका नवरदेवाला त्याच्या लग्नाच्या दिवशी चांगलाच मोठा धक्का बसला. नवरदेव बॅंडबाजासोबत वरात घेऊन गेला. तेव्हा त्याला समजलं की, नवरी गायब आहे आणि तिच्या घराला लॉक लावलेलं आहे.

 

मध्य प्रदेशच्या खंडवामधून ही घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवरदेवाची भेट पूजा नावाच्या तरूणीसोबत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. 2 जूनला आपल्या परिवारासोबत तिच्या घरी गेल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 4 जूनला लग्नाची तयारी झाली आणि काही दिवसाच 11 जूनला परिवारातील काही सदस्यांना घेऊन तो पूजाच्या घरी गेला. त्यांनी नवरीला 10 हजार रूपये आणि काही कपडे दिले. यावेळी लग्नाची तारीख 23 जून ठरवण्यात आली.

जेव्हा 23 जून रोजी नवरदेव वरात घेऊन खंडवा येथे पोहोचला तर त्याला समजलं की, नवरीच्या घराला लॉक लागलं आहे. नंतर नवरदेव आणि त्याच्या परिवाराला शेजाऱ्यांकडून समजलं की, मुलगी आणि तिचा पिता दोन दिवसाआधीच घर रिकामं करून दुसरीकडे गेले.

घराच्या मालकाने पूजाच्या वडिलांचं ओळखपत्र नवरदेवाला दाखवलं. ज्यात त्यानी जे नाव सांगितलं होतं त्यापेक्षा वेगळं नाव होतं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्यांची फसवणूक झाली आहे. नवरदेव आणि त्याच्या परिवाराने लगेच पोलिसांना याची सूचना दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.