Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आमदार पडळकरांची ‘बाळूमामा’ मंदिर व्यवस्थापनाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली ‘ही’ मोठी मागणी

आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिराच्या व्यवस्थापनाकरिता शासन स्तरावरून धनगर समाजातील लोकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.

0 640

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे संत बाळूमामा देवस्थान समिती बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिराच्या व्यवस्थापनाकरिता शासन स्तरावरून धनगर समाजातील लोकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.

 

श्री संत बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान आहे. संपूर्ण भारतातून तसेच परदेशातून भक्त मंडळी या देवस्थानाच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच भक्तिभावाने पूजाअर्चा करतात व दिलखुलास दान दक्षिणा देतात. मी देखील संत बाळूमामांचा भक्त आहे. श्री संत बाळूमामा देवस्थान हे कोल्हापूर येथील धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे नोंदणीकृत आहे. या न्यासाच्या संदर्भात कोल्हापूर धर्मादाय सहआयुक्त यांनी व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट आचरणामुळे रिक्त केलेली आहे. या देवस्थानची नावलौकिकता पाहता व्यवस्थापन समितीकडून होत असलेले भ्रष्टाचार न सांगण्यासारखे आहेत.

तसेच देश, परदेशातून येणाऱ्या भक्त मंडळींची होत असलेली गैरसोय, देवस्थानच्या मालकीच्या मिळकतीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, जंगम व स्थावर लमत्तेचा होत असलेला गैरवापर रोखणे अत्यंत गरजेचं आहे. त्याकरिता आपल्या स्तरावरून उपाययोजना होणे फार गरजेचे आहे असल्याचं मत आमदार पडळकर यांनी व्यक्त केलं आहे.

कोल्हापूर येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरासंदर्भात शासनाकडून स्पेशल कायदा कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान या न्यासाला देखील कायदा करण्यात यावा. या मंदिराच्या व्यवस्थापनाकरिता शासन स्तरावरून धनगर समाजातील लोकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.