Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सोलापुरात धक्कादायक प्रकार ; ईदगाहबाहेर पाकिस्तानी फुग्यांची विक्री करणाऱ्या सूत्रधारांना अटक

0 390

माणदेश एक्सप्रेस न्युज : सोलापूर : बकरी ईदनिमित्त ईदगाह मैदानावर समूहिक नमाज अदा झाल्यानंतर ईदगाहाबाहेर बालबच्च्यांसाठी खरेदी केले जाणारे फुगे चक्क पाकिस्तानी असल्याचे आढळून आले. ‘ लव्ह पाकिस्तान ‘ या मजकुरासह पाकिस्तानी ध्वज छापलेले फुग्यांची विक्री होताना मुस्लीम बांधवांनी वेळीच जागरूकता दाखविली.,फुगे विकणा-या संबंधित दोन व्यक्तींना ताब्यात पोलिसांच्या हवाली केले.

 

अजय अमन पवार व शिवाजी लक्ष्मण पवार (रा. पारधी वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) अशी फुगे विकणा-यांची नावे आहेत. या दोघांनी ज्या विक्रेत्याकडून हे पाकिस्तानी फुगे खरेदी केले, त्या व्यापा-याचाही शोध घेण्यात आला असून त्याचे नाव तन्वीर बागवान असे आहे. या तिघांविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू-मुस्लीम धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या आणि हिंदू-मुस्लीम एकोपा नष्ट करण्याच्या उद्देशाने भारतीय नागरिकांच्या सार्वभौमत्वाचा अवमान केल्याचा आरोप या तिघा आरोपींवर ठेवण्यात आला आहे. तन्वीर बागवान याचे मधला मारूती परिसरात न्यू रोशन खिलौना हाऊस नावाचे दुकान आहे. या दुकानात पाकिस्तानी फुग्यांचा साठा करून विक्री केली जात होती.

एकीकडे आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्रपणे साजरी होत असताना गोवंशांची हत्या होऊ नये म्हणून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सक्रिय होऊन सार्वजनिक रस्त्यांवरील गोवंशाची तस्करी पकडत आहे. तत्पूर्वी, औरगजेबाचे आक्षेपार्ह स्टेटस् समाज माध्यमांवर ठेवण्याचे प्रकार घडल्यामुळे तर दुसरीकडे महापुरूष आणि धर्म संस्थापकांविषयी आवमानजनक मजकूर समाज माध्यमांतून प्रसिध्द करण्यावरून समाजात शांतता भंग करण्याचे प्रकार घडत असतानाच बकरी ईदच्या दिवशी चक्क पाकिस्तानी फुगे विकण्याचा प्रकार उजेडात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.