दुर्दैवी घटना : नवस फेडून येताना भीषण अपघातात ५ महिला भाविक तर १ मुलगा ठार ; १० जण जखमी
नवस फेडण्याकरिता कर्नाटकातील अफझलपूर येथील भागम्मा देवी येथे गेले होते. नवस फेडून गाणगापूर, अक्कलकोट येथे देवदर्शन करुन वागदरी मार्गे अणूरकडे जात होते.
माणदेश एक्सप्रेस न्युज : सोलापूर : अक्क लकोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ ट्रक आणि ट्रक्स क्रूझरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात क्रूझरमधील ६ जण जागीच ठार झाले आहेत. तर १० जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. क्रूझरमधील सर्वजण अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) येथून नवस फेडण्याकरिता कर्नाटकातील अफझलपूर येथील भागम्मा देवी येथे गेले होते. नवस फेडून गाणगापूर, अक्कलकोट येथे देवदर्शन करुन वागदरी मार्गे अणूरकडे जात होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार ट्रक (एमएच 12 यूएम 7186) गुलबर्गा येथून वागदरीमार्गे अक्कमलकोटकडे येत होता. तर क्रूझर जीप (केए 35 ए 7495) अक्करलकोटकडून गुलबर्गाकडे जात होती.
क्रूझरमधील सर्वजण हे देवदर्शन करून कर्नाटकातील अणूर या गावाकडे जात असताना शिरवळवाडी गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात क्रूझर जीपमधील ६ जण ठार झाले. तर १० जण जखमी झाले.
क्रुझरचे चालक सुनिल हणमंतराव पांचाळ (वय 50), सुमित पुजारी (वय 9), रेखा गोविंद पुजारी (वय 40), गोपाल चंद्रकांत पुजारी (वय 50), विठ्ठल हणमंत ननवरे (वय 35), अजित अशोक कुंदले (वय 30), भाग्येश अशोक कुंदले (वय 40), अशोक पुनदिले (वय 45), कोमल शामडे (वय 50), कल्पना अशोक कुंदले (वय 40 सर्व रा. अणूर, ता.आळंद, जि.कलबुर्गी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मृतांमध्ये ५ महिला, तर एक १२ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. कंटेनर चालक अपघातानंतर फरार झालेला आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. या घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, उत्तर पोलीस ठाण्याचे पो.नि.जितेंद्र कोळी, तहसिलदार बाळासाहेब शिरसाठ घटनास्थळी दाखल झाले होते.