सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी हे एक छोटंसं गाव; याच गावात मागच्या काही वर्षात काहीतरी नवीन होणार आहे हे समजलं होतं पण नक्की काय होणार आहे हेच माहीत नव्हतं ; कारण ते जाणून घेण्या एवढी त्यावेळी आमच्यात एवढी समज नव्हती. मोठ-मोठ्या माणसांच्या तोंडून समजू लागलं की गावात काहीतरी नवीन गोष्टी बघायला मिळणार आहे पण काय! तर मग समजले की अमिर खान नावाच्या हिरोने आमचं गाव दत्तक घेतले तेव्हा मात्र खूप भारी वाटलं. कारण आतापर्यंत ज्या हिरोला फक्त टीव्हीवर चित्रपटाच्या माध्यमातून बघत होतो तो हिरो आमचं गाव दत्तक घेतोय. हे एकूण खूपच आनंद झाला .
मुढेवाडी हे गाव छोटस असंल तरी ! हेच गाव आता सिटी सारखं दिसणार होतं ; याच गावामध्ये खूप सारे बदल होणार होते गावांमध्ये जुनी घर पाडून नवीन एकसारखे घर होणार होती गावामध्ये स्विमिंग पूल गार्डन सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होणार होत्या याच गावांमध्ये नवीन काहीतरी बघायला ,फिरायला, एन्जॉय करण्यासाठी लोक आपल्या गावात तिकीट काढून येणार होते मग काय आश्चर्यच ! एवढे सगळे गावात होणार होतं पण हे मात्र ऐकायला भेटलं; पण दृश्य बघायला काय भेटलं नाही!
मग हे स्वप्न स्वप्नच का राहिलं! याला जबाबदार कोण?
असा प्रश्न अजूनही पडला आहे. याचं मुढेवाडी सारख्या गावात अजून काहीतरी नवीन होऊ पाहत असलेले स्वप्न का पूर्ण होऊ शकले नाही!
एवढेच काय तर भारत सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भारतातील महाराष्ट्र राज्य सरकारचा एक प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य महामंडळ आहे याद्वारे व्यवसायांना जमीन खुले भूखंड किंवा बांधलेल्या जागा रस्ते पाणीपुरवठा ट्रेनेज सुविधा पथदिवे यासारख्या पायाभूत सुविधा पुरवते याचे एमआयडीसीच्या माध्यमातून गोरगरिबांना रोजगार उपलब्ध होणार होता नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी मदतीचा हात भेटणार होता पण काय झालं हे स्वप्न मात्र स्वप्नच राहावं का ! मग सांगा ना याला मात्र जबाबदार कोण?
आपल्या गावची ही सुधारणा होणं कोणाच्या हातात आहे या गावातील माणसांच्याच ना!
पण हे मात्र असं होत नाही का कारण याच गावातील परिवर्तनाची दोरी पुढे जर कोणी नेत असेल तर त्याला मागे कसे खेचता येईल याचा विचार मात्र रात्र दिवस केला जातो याची चर्चाही केली जाईल पण आपण सगळे मिळून काहीतरी नवीन करूया असा मात्र विचार कोणीच करत नाही मग हे सगळं असं का! गावातील सुधारलेल्या विचारांचं नक्की म्हणायचं कोणाला कारण सरपंच, पोलीस पाटील, पुढारी, अध्यक्ष, उपसरपंच, डेप्युटी, सदस्य आणि यांच्या फक्त मागे मागे करणारे हे फक्त नावालाच जाईल तिथे मोठेपणा कारण जी मुलं नवीन काहीतरी करायला गेले तर मात्र त्या मुलांना नाव ठेवले जातात. आतापर्यंत आपण जे करू शकलो नाही.ते मात्र इतर मुल करत असतील तर का नाही त्यांना पाठिंबा दिला जात तुमच्यापैकी एकाला तरी स्टेजवर जास्त काही नाही पण आभार तरी मानायला लावले तरी एकालाही जमणार नाही पण जे मुलं नवीन काहीतरी करतायेत. आपण त्यांच्यामध्ये तर नवीन काहीतरी करण्यासाठी आपणही त्यांना पाठिंबा देऊया असा कोणी विचारच करत नाही.
गेल्या काही दिवसापूर्वीचीच ही गोष्ट गावातील एक साधा रस्ता नीट बनवता आला नाही त्याचा पूर्णपणे सिमेंट कोबा करून टाकला हे सगळं अस का! आपलंच गाव घडवण्यासाठी बाहेरच्या लोकांनी आपल्या हातापाया पडावं का ! ज्या वेळी एखादी निवडणूक असते तेव्हा उमेदवार म्हणून हेच मोठे लोक उभे राहतात आणि मतदान देण्यासाठी जनतेच्या पुढे हात जोडता तेच हात गाव घडवण्यासाठी का नाही जोडत ! का त्यांना मान सन्मान आणि सगळीकडे प्रसिध्दी हवी असते आणि म्हणूनच याच पुढारी लोकांमुळे मुढेवाडी गावाचं स्वप्न अधुरं राहताना पाहावं लागलं कारण जे लोक हे गाव घडवणार होते त्यांना हवा होता तो फक्त आणि फक्त प्रतिसाद !
कारण नवीन काहीतरी घडवायचा असेल तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं असतं ते गावातील लोकांचा पाठिंबा तोच मात्र इथे अपुरा पडला! पण अजूनही वाटतं की पुन्हा एकदा याचा विचार कोणी करेल का ! पुन्हा एकदा हेच गाव डेव्हलमेंट होईल का ! अजूनही कोणीतरी असा युवक येईल जो हे अर्धवट राहिलेलं हे अधूर् स्वप्न पूर्ण करेल ? की अजूनही dream city हे स्वप्न हे फक्त स्वप्नच राहील!
कु. रेश्मा राजगे