Latest Marathi News

BREAKING NEWS

 

कोळा येथील कै. शंकर मोरे यांच्या कुटुंबीयास माजी आमदार दीपक आबा साळुंखे- पाटील यांची सांत्वन पर भेट

0 264

माणदेश एक्सप्रेस न्युज : कोळा/वार्ताहर : कोळा गावाचे माजी पोलीस पाटील कै. शंकर बुधाजी मोरे यांचे शनिवार दिनांक २४ रोजी रात्री १०.०० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी त्यांच्या कोळा येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली.

 

यावेळी मोरे कुटुंबियांना धीर देऊन दादांनी आजपर्यँत केलेल्या कामकाजाचा आलेख सांगितला व दादाच्या अपूर्ण राहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामकाज पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून सर्वस्वी प्रयत्न करेन असे सांगितले. यावेळी माजी सरपंच शहाजी हातेकर, युवक नेते हरीभाऊ सरगर, बापू कोळेकर, विष्णू सरगर, अस्लम पटेल, शिवाजी कोळेकर, सतीश काटे, विनोद काटे, धनंजय काटे, संतोष काटे, अभिमन्यू मोरे आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.