Latest Marathi News

BREAKING NEWS

 

Pune Girl Attack : हवालदारासह तीन पोलीस कर्मचारी निलंबित..

0 945

माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : येथील सदाशिव पेठ तरूणी हल्ला प्रकरण पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाणे अंकित येणाऱ्या पेरूगेट पोलीस चौकीतील पोलीस हवालदारासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे. या तीन ही पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबतचे आदेश परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी गुरुवारी (ता. २८) रात्री जारी केले.

 

पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत मंगळवारी (ता. २७ जून) सकाळी एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते. तसेच, या घटनावेळी तरुणीसोबत उपस्थित असणाऱ्या त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) या आरोपीला अटक केली. परंतु पेरूगेट पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना, चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी कामाच्या ठिकाणावरून गैरहजर होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.