माणदेश एक्सप्रेस न्युज : देवबंद : ‘भीम आर्मी’ चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशमधील देवबंद भागात गोळीबार झाला आहे. यात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हरियाणातील वाहनामधून आलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. यात आझाद यांच्या पोटावर आणि कमरेला गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत.
उतर प्रदेशातील देवबंद येथे चंद्रशेखर आझाद आपल्या कारमधून आले होते. दरम्यान, हल्लेखोर त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. देवबंद येथे येताच हल्लोखोरांनी त्यांच्या वाहनावर अचनाक हल्ला केला. या हल्ल्यातून आझाद थोडक्यात बचावले आहेत. गाडीच्या सीटवर आणि दरवाजावर गोळ्यांच्या खुणा आहेत. दरम्यान, हा हल्ला कुणी व का केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत उत्तर प्रदेश प्रशासनाने दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुासर, चंद्रशेखर यांच्यावर एका कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यांच्या गाडीच्या दरवाजातून एक गोळी आरपार गेली आहे. यातील एक गोळी चंद्रशेखर यांच्या कमरेला स्पर्श करून गेली. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाच्या सर्व काचा फुटल्या आहेत.