Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सांगलीतील लाचखोर पालिका अधिकाऱ्याच्या घरातून रोकड जप्त

0 1,151

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सव्वा लाखाची लाच घेणार्या् महापालिकेच्या अग्निशमन अधिकार्या्च्या घरझडतीमध्ये लाच लुचपत विभागाच्या पथकाला सात लाखांची रोकड आढळून आली.

 

याबाबत माहिती अशी, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी विजय आनंदराव पवार (वय ५० रा. संभाजीनगर, सांगलीवाडी) यांना कार्यालयात सव्वा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. अग्निसुरक्षा यंत्रणा बसविणार्याल कंपनीला ना हरकत दाखला देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच पवार याने मागितली होती. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.

लाचखोर अधिकारी पवार याला रंगेहात अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या सांगलीवाडीतील निवासाची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या घरातून ७ लाख १ हजार ६०० रुपयांची रोकड मिळाली असून ही रोकड जप्त करण्यात आली असल्याचे उपअधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. पवार यांना न्यायालयाने दि. ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.