माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी पोलिसांनी घडलेल्या वस्तुस्थितीची तक्रार पोईसनी घेतली नसल्याने व पोलिसांनी लिहलेल्या तक्रारीवर दबाब टाकून सही करून घेतली, त्याचबरोबर माझ्यावर अन्याय, अत्याचार करणारे व्यक्तीस पोलीस जाणीवपूर्वक पाठीशी घालत असून या बाबत दिघंची येथील सौ. रोहिणी तानाजी मोरे यांचे आटपाडी पोलिसांच्या विरोधात आज दिनांक २८ रोजी धरणे आंदोलन करण्यात आहेत.
यावेळी बोलताना सौ. रोहिणी तानाजी मोरे म्हणाल्या, आटपाडी पोलिसांनी घडलेली वस्तुस्थितीची तक्रार घेतलेली नाही. पोलिसांनी लिहलेल्या तक्रारीवर मला दबाव टाकून माझी सही करून घेतली आहे. त्याच बरोबर माझेवर अन्याय अत्याचार करणारे व्यक्तीस पोलिस जाणून बुजून पाठीशी घालत आहेत.
मला न्याय मिळणेसाठी मी व माझे कुटूंब आटपाडी पोलिसांचा निषेध नोंदवून धरणे आंदोलन करीत आहे. चोराला, गुन्हेगारी प्रवृत्तीला व अन्याय करणाऱ्याला पोलिसांकडून अभय व सर्वसामान्याला त्रास अशी अवस्था आटपाडी पोलिसांच्या मनमानीमुळे झाली आहे.
त्यामुळे सर्व सामान्यं जनतेला त्रास होत आहे. या त्रासातुन मुक्तेतेसाठी हे आंदोलन आहे. ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याची तक्रार लिहून घ्यावी योगय कारवाई व्हावी व पोलिसांनी राजकीय दबावापोटी सर्वसामान्यांच्यावर होणारा अन्याय थांबविणेसाठी हे आंदोलन आहे. तरी आटपाडी तालुक्याीतील ज्यांच्या ज्यांच्यावर पोलिसांचा अन्याय झाला अशा सर्व अन्यायग्रस्त लोकांनी या आंदोलनाध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन देखील रोहिणी मोरे यांनी आटपाडी तालुक्यातील जनतेला केला आहे.