माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी येथील कदम हॉस्पिटल चे डॉ. एम.बी.कदम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
डॉ. कदम हे माण तालुक्यातील शेनवडी येथील होते. त्यांनी आटपाडी येथे स्वत:चे हॉस्पिटल उभा केले होते. आटपाडी तालुक्यातील अनेक गोर गरीबांचे डॉक्टर म्हणून त्यांची तालुक्यात ख्याती होती.
एक महिना पूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु ते कोमात गेल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते परंतु अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.
गोरगरीब जनतेचा डॉक्टर गेला, अशा अनेकांनी भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.