Latest Marathi News

BREAKING NEWS

 

तेलंगाणाचे सीएम केसीआर यांना सोलापूर प्रशासनाने परवानगी नाकारली

0 1,119

माणदेश एक्सप्रेस न्युज : सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) यांना वाखरी येथे आज मंगळवारी (ता. २७) पालखी व वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

 

कायदा व सुव्यवस्था आणि वारकरी भाविकांची सुरक्षा यासाठी दक्षता म्हणून तसेच त्यांच्या जिवाला कोणताही धोका उद्भवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी केसीआर यांच्यावतीने भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रविवारी परवानगी मागितली होती.

हेलिकॉप्टर उतरण्यासाठी सरकोली (ता. पंढरपूर) येथील भैरवनाथ महाविद्यालयाच्या प्रांगणात हेलिपॅड उभारण्यात आले होते. हेलिपॅडसाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे, मात्र पंढरपूर अग्निशमन दल, पोलिस निरिक्षक पंढरपूर, निवासी उपजिल्हाधिकारी यांची एनओसी सोमवारी रात्री आठपर्यंत मिळाली नव्हती. त्यानंतर परवानगी नाकारल्याचे समोर आले. हेलिकॉप्टरने वारकऱ्यांचे लक्ष विचलित होऊन चेंगराचेंगरी होऊ नये असेही कारण परवानगी नाकारण्यामागे देण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.