माणदेश एक्सप्रेस न्युज : कोळे : कोळा ता. सांगोला, जि. सोलापूर गावाचे माजी पोलीस पाटील शंकर बुधाजी मोरे यांचे शनिवारी रात्री १०.०० च्या दरम्यान ह्र्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कोळा येथील पत्रकार विशाल मोरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संस्थेचे सचिव नंदू मोरे यांचे ते वडील होते.
शनिवारी रात्री त्यांना ९.३० च्या दरम्यान ह्र्दयविकाराचा झटका आला होता. यावेळी त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी आटपाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यावर रविवार रात्री २.३० च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसऱ्या दिवशीचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक २७/०६/२०२३ रोजो कोळा येथे सकाळी ७.३० च्या दरम्यान होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कोळा येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहाराच्या ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या शेवटच्या काळात कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असल्याने या ठिकाणी मोठे बौद्ध विहार उभे राहिले पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
तब्येत साथ देत नसतानाही त्यांनी मुंबईला अनेक वेळा जात मुंबई गावकरी यांच्याशी संपर्क साधत बौद्ध विहारासाठी त्यांनी मुंबईकर गावकऱ्यांच्या माध्यमातून बौद्ध विहाराच्या जागा खरेदीसाठी पैसे जमा करत बौद्ध विहारासाठी जागेची मोठी अडचण दूर केली.
त्यांच्याच काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध विहारासाठी मोठा निधी मिळविला व पहिल्या टप्यातील वास्तू आकारास आली. पहिल्या टप्यातील बौद्ध विहाराच्या उद्घाटना पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या निधानाने त्यांना परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.