Latest Marathi News

BREAKING NEWS

 

….तर मी एक पाऊल मागे घेईल : माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी कार्यकर्ते बैठकीत केले सुतोवाच

0 3,961

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आमच्या भावांत भांडणे आहेत यात कोणतेच तथ्य नाही, अंग झटकून काम करावे लागेल, येथून पुढे सर्व निर्णय हे बापूसाहेबांनी घ्यावेत मी, एक पाऊल घेण्यास मागे असल्याचे प्रतिपादन आटपाडी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी केले.

 

आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणी येथे संपन्न झालेल्या देशमुख गटाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दुष्काळ आणि कारखाना या दोन बाबी असल्याने त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी कारखान्याला परवानगी दिली नव्हती. परंतु शंकरराव चव्हाण यांच्या नंतर मात्र कारखान्यास परवानगी मिळाली व कारखाना सुरु झाला.

ज्यावेळी आपला कारखाना सुरु होता, त्यावेळी आजूबाजूचे इतर कारखाने हे बंद पडलेले होते. यांचे सुद्धा सिंहावलोकन झाले पाहिजे. बऱ्याच कार्यकर्त्यांनी आम. अनिलभाऊ बाबर यांना पाठींबा देण्याचा निर्णय चुकीचा ठरविला असला तरी, आपण त्यांना साखर कारखान्याला शासनाच्या माध्यमातून जी मदत मिळायला पाहिजे होती तीच मागत होते. इतर काही मागितले नसल्याचा त्यांनी यावेळी खुलासा केला.

तसेच येथून पुढील काळात सर्व निर्णय हा अमरसिंह बापूंनी घ्यावेत मी एक पाऊल मागे घेण्यास तयार असल्याचे सांगितल्याने येथून पुढील देशमुख गटाची सर्व सूत्रे ही अमरसिंह देशमुख यांच्या ताब्यात जाणार असून पुढील सर्व निर्णय हे आता अमरसिंह देशमुख हेच घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.