Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य, २४ जून २०२३: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस…, काय सांगते तुमची राशी…

0 875

मेष: मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. सरकारी कामात मात्र यश मिळेल.

 

वृषभ: आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. संततीसाठी पैशांची गुंतवणूक करू शकाल.

मिथुन: शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. भावंडे व शेजारी – पाजारी ह्यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील. आर्थिक व्यवहारात मात्र सावधानता बाळगावी लागेल.

कर्क: शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. अवैध गोष्टींपासून शक्यतो दूरच राहावे.

सिंह: कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. लाभ होतील. सामाजिक मान – मरातब वाढेल. वाणी व कृती ह्यावर नियंत्रण ठेवणे हितावह राहील. काही कारणाने आपल्या रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कन्या: शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अचानकपणे खर्च उद्भवतील. शक्यतो भांडणापासून दूर राहावे.

तूळ: वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल, पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल.

वृश्चिक: नोकरी – व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते. संततीची प्रगती झाल्याने आपले समाधान होईल.

धनु: आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. कोणतीही योजना विचारपूर्वक अंमलात आणा. प्रतिस्पर्धी व विरोधक यांच्याशी संभाव्य वाद टाळा.

मकर: खाण्या – पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवावा लागेल. नोकरी- व्यवसायात मात्र अनुकूलता राहील. भागीदारांशी मतभेद संभवतात.

कुंभ: प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. भागीदारीतून फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल.

मीन: आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.