माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : खानापूर पंचायत समितीचे (विटा) शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन दशरथ विभुते यांचा शनिवार दिनांक २४ रोजी सांयकाळी ५.०० वा. सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभाग खानापूर पंचायत समिती, विटा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार अनिल (भाऊ) बाबर हे असून असून प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक, कोल्हापूरचे महेश चोथे हे आहेत. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, सावित्रीदेवी उद्योग समुहाचे प्रमुख भारत (तात्या) पाटील, सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षण अधिकारी महेश धोत्रे, आटपाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, खानापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास राजे, कडेगावचे गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी हे उपस्थित राहणार आहे.
सदरचा कार्यक्रम आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉल, आटपाडी येथे शनिवार दिनांक २४ रोजी सायंकाळी ५.०० वा संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.