माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : जवाहरलाल नवोदय विद्यालय सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या निवड परीक्षेत जि.प.प्राथ. शाळा पांढरेवाडीची विद्यार्थिनी कु श्रीया मिथुन मोटे हिने घवघवीत यश संपादन करून जिल्हा गुणवत्ता यादी स्थान मिळवले आणि जवाहरलाल नवोदय पलूस येथे तिची निवड झाली आहे.
लहानपणापासूनच वक्तृत्व, कथाकथन मध्ये तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तिने यश मिळवले होते. अत्यंत अभ्यासू मुलीची निवड झाल्यामुळे पांढरेवाडी पंचक्रोषीत सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे. आज पंचायत समिती आटपाडीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री हसबे यांनी जिल्हा परिषद शाळा पांढरेवाडी येथे श्रीया मोटे हिचे अभिनंदन केले. यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी माणिककाका चव्हाण यांनीही तिचे अभिनंदन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष सुरेखा जाधव, तसेच प्रा. चव्हाण यांनीही तिचे अभिनंदन केले. सलग तिसऱ्या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरेवाडी चे विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. त्याबद्दल सर्वांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.