Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य, २३ जून २०२३: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

0 729

मेष: शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीची काळजी राहील.

 

वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील.

मिथुन: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील.

कर्क: केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील.

सिंह: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल.

कन्या: आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल.

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल.

वृश्चिक: कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल.

धनु: शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती सुद्धा नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील.

मकर: व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे ह्याकडे लक्ष राहील.

कुंभ: प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल.

मीन: मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील.

Leave A Reply

Your email address will not be published.