माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : 16 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सांगली अंतर्गत श्री भवानी विद्यालय व आबासाहेब खेबुडकर जुनियर कॉलेज आटपाडी येथील एन.सी.सी. विभागाचे A सर्टिफिकेट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळविले.
सांगली जिल्ह्यातील 25 प्रशालेमध्ये एनसीसी A सर्टिफिकेट ही परीक्षा घेण्यात आली.यामध्ये श्री भवानी विद्यालयाच्या 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी 22 विद्यार्थ्यांनी AAA ग्रेड मिळवली. तर तीन विद्यार्थ्यांना BBB ग्रेड मिळाली. अशी ग्रेड मिळणारे श्री भवानी विद्यालय हे सांगली जिल्ह्यातील एकमेव विद्यालय आहे.
सर्व यशस्वी कॅंडिडेट अभिनंदन करण्यात येत असून त्यांना जाधव आर.एच. (एनसीसी अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.