माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील सिरतुल मुस्लिमीन ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था आटपाडी या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडी बिनविरोध झाल्या.
सिरतुल मुस्लिमीन ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडी बाबत संस्थेच्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारी एम.बी. कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न झाली. यावेळी बशीर अहमद बाबुलाल मुल्ला, नौशाद अल्लाबक्ष मुल्ला, महंमद बकस शेख, संतोष सिध्दलिंग हिचे, गुलाब विठ्ठल ऐवळे, आयाज ईलाई आतार, पांडुरंग शिवाजी सागर, महिराज इनुस खाटीक, शाकीरा दिलावर शेख यांची संचालक म्हणून बिनविरोध निवडी झाल्या.
संचालक मंडळाच्या निवडीनंतर चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडी देखील बिनविरोध झाल्या. यामध्ये चेअरमनपदी दिलावर खाटीक यांची तर व्हा. चेअरमनपदी आयनुद्दिन इनामदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवडी झाल्या. निवडीनंतर चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला.