माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडीच्या तहसीलदारपदी सुरगणा येथील तहसीलदार सचिन मुळीक यांची नियुक्ती झाली होती. परंतु त्याचा वेळी आटपाडीच्या तहसीलदार श्रीमती बाई माने यांना नियुक्तीचा कोणताही आदेश नव्हता. त्यामुळे बाई माने यांनी या बदलीला मॅट मध्ये आवाहन दिले होते. त्यांच्या या बदलीला मॅटने स्थगिती दिली असल्याने आटपाडीच्या तहसीलदारपदी पुन्हा बाई माने याच राहणार असल्याने बदलीने आलेले तहसीलदार सचिन मुळीक यांना मात्र सध्या थांबावे लागणार असून ते ही मॅटमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आटपाडीच्या तहसीलदारपदी नाशिक जिल्ह्यातील सुरगणा येथील तहसीलदार सचिन मुळीक यांच्या नियुकीतचे आदेश महसूल आयुक्तांनी काढले होते. परंतु त्याच वेळी बाई माने यांच्या बदली कोठे झाली याबाबत आदेश काढण्यात आले नव्हते.
तहसीलदार माने यांची आटपाडीत बदली होऊन २२ महिने झाले आहेत. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची तीन वर्षे बदली करता येत नाही. जर बदली केली असेल तर त्या विरोधात मॅटमध्ये दाद मागण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे बाई माने यांनी मॅट दाद मागितली होती. मॅट प्राधिकरणाने त्यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली होती.
त्यामुळे नव्याने रुजू झालेले तहसीलदार सचिन मुळीक यांनी स्वीकारलेला पदभार सोडून मुंबईला धाव घेतली आहे तर बदलीला स्थगिती मिळवून आलेल्या तहसीलदार बी.एस.माने यांनी आज पुन्हा पदभार स्वीकारला. त्यामुळे बाई माने यांची बदली व्हावी म्हणून ‘देव पाण्यात घातलेल्यांना’ मात्र पदरी निराशा आली आहे.