माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश उत्तम दौंडे व तर व्हा चेअरमन पदी राजेंद्र आबा लाटणे यांची बिनविरोध फेरनिवड झाली.
आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि आटपाडी या संस्थेची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली. यामध्ये संचालक पदी दीपक देवराव देशमुख, सर्जेराव भरत राक्षे, महेश आप्पासाहेब देशमुख, सागर चंद्रकांत भागवत, महादेव शिवाजी डोईफोडे, सौ राणी विलास कवडे, श्रीमती रंजना दत्तात्रय खटावकर, मोहन भगवान पारसे, विकास विठ्ठल भुते यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.
संस्थेच्या कार्यालयात चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आटपाडी चे प्राधिकृत अधिकारी एम.बी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नूतन संचालक मंडळाच्या सभेत बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी एम.बी. कुलकर्णी यांच्या हस्ते नूतन चेअरमन प्रकाश दौडे व व्हा. चेअरमन राजेंद्र लाटणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तसेच नूतन सर्व संचालक मंडळाचा फेटा बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव दत्तात्रय स्वामी, क्लार्क मनोज सपाटे, सौ राजश्री सुतार व कु. मयुरी ऐवळे तसेच पिग्मी एजंट चंद्रशेखर कवडे, संभाजी देशमुख, अरुण साळुंखे, सुजित सपाटे, हितेश गवळी, सुरज म्हेत्रे, यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व सभासद व संचालक मंडळाचे नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी आभार मानले.