माणदेश एक्सप्रेस न्युज : अहमद मुल्ला : म्हसवड : उच्च विद्युत वाहिनीच्या विद्युत तारेचा डंपरला स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत डंपर चालक भीमराव दाजी माने वय 52 रा. पिंपरी हे जागीच मयत झाले. सदर घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव दाजी माने हे पिंपरी येथील रहिवासी असून दाजी करे यांच्या मालकीच्या डंपरवर ते गेली अनेक वर्षे चालक म्हणून काम करत आहेत. आज नेहमी प्रमाणे ते पिंपरी नजीक असणाऱ्या करे वस्ती वरून येत होते.
कचरेवाडी येथे एक विहिरीचे काम त्यांनी घेतले असून त्या कामावर ते निघाले होते. कामावर येत असताना मनकर्णवाडी येथील तरंगेताली नजिक पळशी सब स्टेशन येथून गोंदवले गावाकडे उच्च विद्युत वाहिनीची लाईन गेलेली आहे.
त्या तारेला डंपरच्या डाव्या बाजूच्या भागाला तारेचा स्पर्श झाला अन तार तुटून डंपरच्या केबीन वरून चालक बाजूला ती तार आली. चालकाला त्या तारेचा स्पर्श झाला अन त्यातच चालक सीट वरून खाली फेकले गेले व जागीच मयत झाले.
ही घटना कळताच परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदरच्या घटनेची फिर्याद दाजी आण्णा करे रा.पिंपरी ता माण यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली सदर घटना कळताच घटनास्थळी म्हसवड पोलिसांनी भेट दिली व पंचनामा केला.