Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य २० जून २०२३: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

0 907

मेष: वाद – विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. एखाद्या स्त्रीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

वृषभ: सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. धनसंचय होऊ शकेल.

मिथुन: आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल.

कर्क: मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल.

सिंह: कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल. खर्च नियंत्रित ठेवावे लागतील.

कन्या: सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल.

तूळ: नोकरी – व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल.

वृश्चिक: दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी – व्यवसायात अनुकूलता लाभेल.

धनु: शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी – व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल.

मकर: आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान – सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे.

कुंभ: आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. सामाजिक मान – सन्मानात वाढ होईल. दुपार नंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकाल.

मीन: घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणाने आपल्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विरोधकांवर मात करू शकाल.

(टीप : माणदेश एक्सप्रेस यातून कोणताही दावा करत नाही. केवळ माहिती पोहचविण्याचे काम करत आहे)

Leave A Reply

Your email address will not be published.