देशमुखवाडीत धर्मांतराचा प्रयत्न : आर्थिक प्रभोलन दाखवून ख्रिश्चन धर्म स्विकारण्याचा दबाव : आटपाडी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी येथे धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न झाला असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी नितीन मोहनराव देशमुख वय ३५ हे देशमुखवाडी येथे राहण्यास आहेत. त्यांच्या घरी यातील आरोपी पुंडलिक पुनाजी लोंढे रा. सोलापूर, सौ. रंजना पुंडलिक लोंढे रा. सोलापूर व आरोपी अनिता प्रकार कारंडे रा. चेंबूर, मुंबई हे आरोपी घरी आहे होते.
यावेळी आरोपींनी हिंदू धर्म व देवदेवतांच्या बाबत हरामी असे अपशब्द वापरले. तसेच देवाऱ्यांतील बाळकृष्णाची मूर्ती फेकून दिली. आमचा येसू सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणून ख्रिश्चन धर्म स्विकारला तर तुम्हाला पैसे देवू असे आर्थिक प्रभोलन दाखवले.
त्यामुळे आरोपींनी हिंदू धर्माचा व देवदेवतांचा अपमान केला असून यामुळे फिर्यादीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी फिर्यादी नितीन मोहनराव देशमुख याच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भा.दं.वि.स. कलम २९५ (अ), २९८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकणी आटपाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.