Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी : शेतामध्ये कामाला असणाऱ्या सालगड्याने मोटारसायकल केली लंपास

0 2,047

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : शेतामध्ये कामाला असणाऱ्या सालगड्याने मोटारसायकल लंपास केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील कामथ येथे घडली. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी विजयकुमार गुरव (रा. तासगाव) यांची आटपाडी तालुक्यातील कामथ येथे शेतजमीन आहे. या शेतीमध्ये सालगडी म्हणून नवनाथ रोहिदास माने (रा/ पंढरपुर जि. सोलापूर) हा कामास होता. विजयकुमार गुरव यांची दुचाकी ( MH-10-AS-1530) त्यांच्या शेतातील घरासमोर लावली होती.

परंतु सदरची दुचाकी आरोपी नवनाथ रोहिदास माने याने चोरून नेली आहे. याबाबत विजयकुमार गुरव यांच्या फिर्यादीनुसार आरोपी नवनाथ रोहिदास माने याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हाच्या अधिक तपास हा पोना महिते करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.