मेष: विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी – व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल.
वृषभ: आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्च दरम्यान संघर्ष होऊ शकतो.
मिथून: आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल.
कर्क: आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.
सिंह: कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल.
कन्या: सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे.
तूळ: आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात.
वृश्चिक: सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा.
धनु: आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार – विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल.
मकर: आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण – घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल.
कुंभ: आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उदभवतील.
मीन: आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर व मन अस्वस्थ राहील.