माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची बदली झाली असून त्यांच्या जागा तहसीलदार म्हणून सचिन मुळीक यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत.
सचिन मुळीक हे या अगोदर आटपाडी येथे परीक्षाविधीन कालावधीत आटपाडीचे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. परीक्षाविधीन कालावधी संपल्यानंतर आटपाडीच्या तहसीलदारपदी बाई माने यांची नियुक्ती झाली होती.
परीक्षाविधीन कालावधी संपल्यानंतर सचिन मुळीक यांची नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तहसीलदारपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता त्यांची सुरगणा येथून आटपाडीच्या तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याचे आदेश प्राप्त झाले असून आज ते आटपाडी येथे रुजू होणार आहेत.