माणदेश एक्सप्रेस न्युज : पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकी मध्ये विद्यमान अध्यक्ष कल्याणराव काळे गटाची सत्ता आली. परंतु याच वेळी विरोधी गटाचे प्रमुख विठ्ठल सहकारीची अध्यक्ष अभिजीत पाटील यांची गाडी फोडली.
कारखान्यासाठी अटीतटीने ९३ टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूला विजयाचा विश्वास होता. त्यामुळे दोन्ही गटाचे प्रमुख नेते मतमोजणी केंद्राच्या परिसरात आले होते. त्यात अभिजीत पाटील हे सुद्धा होते. निवडणूक निकालाच्या पहिल्या फेरीपासूनच काळे गटाने आघाडी घेतली होती. पहिल्या दोन तासांतच काळे गटाची आघाडी ही जवळपास १००० च्या आसपास गेली होती. त्यामुळे काळे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात झाली.
त्याच वेळी अभिजीत पाटील यांची गाडीची काच कोणीतरी फोडली. त्यावरून वातावरण तणावपूर्ण बनले होते. खुद्द अभिजीत पाटील यांनी पोलिसांशी चर्चा करून घटनेची माहिती दिली, त्यामुळे निवडणुकीच्या निकालाला मात्र गालबोट लागले गेले आहे.
अभिजीत पाटील यांच्या गाडीची काच फोडल्याच्या घटनेबाबत कल्याणराव काळे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांनी काच फोडली, असे म्हणता येणार नाही. विरोधकांकडून काही ठिकाणी आर्थिक उलाढाल जास्त झाली आहे. त्यामुळे त्यांचे हिशेब जुळत नाहीत. त्यातूनही हे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या लोकांनी काच फोडली, असं म्हणता येणार नाही. कारण हे स्टंटबाजीचे राजकारण आहे.