Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सांगली : नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणी चार आरोपी अटकेत

0 974

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सचिन डोंगरे याच्या जामिनासाठी सतत विरोध केल्यानेच नालसाब मुल्ला याचा खून केल्याची कबुली दिल्याची संशयितांनी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

याप्रकरणी सनी करुणे (वय २३, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), विशाल सुरेश कोळपे (वय॒ २०, रा. लिंबेवाडी, संतोष मलमे (वय २०, रा. खरशिंग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.

शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मुल्ला त्याच्या घरासमोर एकाशी बोलत बसला होता. त्यावेळी त्याच्या घराशेजारच्या रस्त्यावरील अंधारातून चार संशयित तेथे आले. त्यांनी काही कळायच्या आतच अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात मुल्ला याला सहा गोळ्या लागल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात तलवारीने वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित चालत निघून गेले.

दरम्यान २०१९ मध्ये सचिन डोंगरे याच्यावर मोका अंतगर्त कारवाई करण्यात आली होती. त्याचा जामीन लवकर होऊ नये तसेच तो कारागृहातून बाहेर येऊ नये यासाठी नालसाब मल्ला सातत्याने प्रयत्नशील होता. डोंगरे याच्या जामिनाला सतत नालसाब मुल्ला याने सतत विरोध केला होता. त्याचा राग आल्यानेच सचिन डोंगरे याने संशयित चौघांना नालसाब मुल्ला याची गेम करण्यासाठी डोंगरे यानेच सांगितल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

यातील एक संशयित स्वप्नील मलमे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी, चोरी असे चार गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या संशयितांनी क्षेत्रात नाव करण्यासाठीच याच्याकडून सुपारी घेऊन नालसाब मुल्ला याचा खून केल्याची गहिरी वर्तुळात आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, अमितकुमार पाटील, दीपक गायकवाड, संदीप नलवडे, अरूण औताडे, आमसिद्ध खोत, अमोल लोहार आदींच्या पथकाने हीं कारवाई केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.