माणदेश एक्सप्रेस न्युज : राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नालसाब मुल्ला याचा गँगवॉरमधून गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. काल (दि. १७) सायंकाळी झालेल्या या हल्ल्यात मुल्ला गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबारानंतर सांगली परिसरात मोठी खळबळ माजली.
याबाबत अधिक माहितीनुसार, शनिवारी रात्री नालसाब मुल्ला हा त्याच्या घराबाहेर बसला होता. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोघे हल्लेखोर आले. त्यांनी क्षणाधार्थ एकूण आठ गोळ्या झाडल्या. यापैकी पाच गोळ्या नालसाब याला लागल्या. त्यांनी हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. गोळीबारानंतर नालसाब याला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. परंतु त्याचा जागीच मृत्यू झाला. गँगवॉरमधून हा खून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नालसाब मुल्ला हा सांगलीतील नामचीन गुंड होता. त्याच्यावर खून, सावकारी इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला मोका देखील लावण्यात आला होता. नालसाब मुल्ला हा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता.