Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यात वारकरी महिलेचं अपघाती निधन: गावात पसरली शोककळा

0 1,049

कोल्हापूर : आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वाशी येथील वारकरी महिलेचा सासवड येथे ट्रॉलीखाली सापडून जागीच मुत्यू झाला. सोनाबाई मारुती कुंभार वय(७०) असे त्या मृत वारकरी महिलेचे नाव असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेले आबासो पाटील ही गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी दुर्घटनेने वाशी गावावर पसरली शोककळा पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर आषाढी वारीसाठी आळंदीमधून पायी दिंडी सोहळ्यासाठी वाशी ता.करवीर येथून ९ जून रोजी आळंदीकडे प्रस्थान झाले. या दिंडी सोहळ्यासाठी वाशी व परिसरातून ६२ वारकरी सहभागी झाले होते.
सासवड येथून दिंडीतील चालणाऱ्या लोकांनी पायी चालत वारकरी दिंडी मार्गाने पुढे निघून गेलेत व साहित्य असणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीत बसलेले सात ते आठ वारकऱ्यांना घेऊन दिंडी मार्गाच्या दिशेने पंढरपूरकडे निघाला होता.

दरम्यान ट्रालीमध्ये बसलेल्या सोनाबाई मारूती कुंभार यांनी वाशी गावची दिंडी दिसल्यानंतर ट्रॉलीमधून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा दांडीवरून पाय घसरल्याने त्या सरळ ट्रालीच्या चाकात सापडल्याने ट्रॉलीचे चाक छातीवरून गेल्याने त्याचा जागीच मुत्यू झाला. सोनाबाई कुंभार यांना वाचवण्यासाठी गेलेले आबासो पाटील हेही ट्रॉलीखाली सापडल्याने ते ही गंभीर जखमी झाले आहेत.

त्याच्यावर सासवड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघाताची नोंद सासवड पोलीस ठाण्यात झाली आहे. त्याच्या पश्चात मोठा परिवार असून मनमिळावू स्वभावाच्या असल्याने त्याच्या या अपघाती निधनाने गावावर शौककळा पसरली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.