Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडीच्या तहसीलदार श्रीमती बाई माने यांची बदली

0 3,523

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची बदली झाली असून त्यांच्या जागा तहसीलदार म्हणून सचिन मुळीक यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत.

 

आटपाडीच्या तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर बाई माने यांनी कामाचा धडाका लावला होता. ई पिक पाणी नोदी बाबत त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम केले होते. त्याच बरोबर त्यांनी कार्यालयातील कमर्चारी व अधिकारी यांना शिस्तीचे धडे देण्याचे कामही त्यांनी केले.

वाळू तस्करीला त्यांनी चाप लावला होता. वाळू तस्करांनी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न ही केला. परंतु, त्यांनी न जुमानता वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले. हे काम करत असताना त्यांना माहिती अधिकाऱ्यांच्या कडून वारंवार त्रास देण्याच्या प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला.

समाधान मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील अनेक लोकांची महसूल संबंधी कामे त्यांनी केली. त्याच बरोबर 7/12 दुरुस्ती चे कॅम्प लावून जुने 7/12 दुरुस्त करून दिले. रस्ता केस मध्ये महसूल कोर्टात केस चालू असेल तर मिटवून घ्या असे सांगून समेट घडवून आणला. शेवटच्या टप्यात त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी वर्गाकडून “बहुचर्चित वाळू तस्करी प्रकरणी” त्यांना राजकीय लोकांना हाताशी धरून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.