माणदेश एक्सप्रेस न्युज : म्हसवड : सांगली येथील रिच आधार कंपनी सतीश बंडगर याने म्हसवड परिसरातील चार जणांची १८ लाख ४० हजार ५०० रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार महादेव सुदाम काटकर रा. वरकुटे मलवडी ता. माण यांनी महसवड पोलीस ठाण्यात दिली असून याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रिचआधार मल्टीट्रेडर्स अँन्ड डेव्हलपर्स एल.एल.पी., सांगली चे चेअरमन सतिश काका बंडगर याने वेळोवेळी महादेव सुदाम काटकर रा. वरकुटे मलवडी ता. माण यांची रुपये 6,50,000/- रक्कमेची तसेच हणमंत सोपान खरात रा.वरकुटे मलवडी ता.माण जि.सातारा यांची 1,60,000/- रुपये, पोपट बयाजी मिसाळ, रा.वरकुटे मलवडी ता.माण जि.सातारा यांची 2,20,000/- रुपये, शितल आप्पासाहेब पुकळे,रा.पुकळेवाडी ता. माण जि. सातारा यांची 4,00,000/- रुपये, राजकुमार महालिंग डोंबे, रा.म्हसवड ता.माण, जि.सातारा यांची 4,10,500/- रुपये अशी चार लोकांची मिळुन 18 लाख,40 हजार ,500/- रुपये रक्कमेची आर्थिक फसवणुक केली आहे.
याबाबत रिचआधार मल्टीट्रेडर्स अँन्ड डेव्हलपर्स एल.एल.पी. सांगली चे चेअरमन सतिश काका बंडगर याच्या विरुध्द महादेव काटकर यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्हाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.