टेंभू योजनेच्या पाणी प्रश्नी निघणाऱ्या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आनंदरावबापू पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनची ८0 टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु शाश्वरत पाळ्या बांधून दिलेल्या नाहीत. तसेच तालुक्यातील अनेक गाव या योजने पासून वंचित गांवे राहिलेले असून या बाबत आटपाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चा मध्ये मोठा संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते आनंदरावबापू पाटील यांनी केले आहे.
या मोर्च्याच्या माध्यमातुन अनेक मागण्या अनेक मागण्या करण्यात आलेले असून यामध्ये प्रामुख्याने क्लस्टरसाठी आवश्यक ते सर्व नकाशे लाभधारक कुटुंबांच्या दोष मुक्त याद्या द्या. आटपाडी आणि घाणंद वितरीकांवर भयंकर प्रलंबित आहे ते अति तातडीच्या पायावर पूर्ण करणे, वंचित गावे आणि टापूंना सिंचन सुविधा देण्यासाठी लवकरात लवकर प्लॅन इस्टिमेट आणि निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामे सुरू करावीत या मागण्या करण्यात येणार असल्याचे आनंदरावबापू म्हणाले. सदर मोर्चाला श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.