माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची पांढरेवाडी येथे जमिनीच्या केलेल्या मोजणीमध्ये घराचा कोपरा आल्याने तो काढून घे म्हणत दोघांची एकावर चाकूने वार केल्याची घटना असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी अक्षय शिवाजी मोरे (वय २६) रा. दिघंची पांढरेवाडी हे त्यांच्या पांढरेवाडी गावचे हददीतील शेत जमीन गट नं.158 मध्ये मक्याला पाणी पाजत असतांना यातील आरोपी तानाजी सुखदेव मोरे रा.दिघंजी पांढरेवाडी याने जमीन गट नं.160 ची मोजणी चुकीची झाली असून फिर्यादी ला घराचा कोपरा आमच्या जमीनीचे हदीमध्ये येत आहे. तो काढुन घे असे म्हणुन शिवीगाळ,दमदाटी करुन त्याचे जवळे असले चाकुने फिर्यादीचे मानेवर मारुन जखमी केले.
तर दुसरा आरोपी नंदु पवार रा. तरसवाडी, ता.खटाव जि.सातारा याने फिर्यादीला तु जर पोलीस स्टेशन येथे जावुन आमचे विरुध्द तक्रार दिली तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देवुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन केली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलीस ठाणे येथे कलम कलम-324,323,504506,34 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.