Latest Marathi News

BREAKING NEWS

 

बुद्धिमान नक्की म्हणावं तरी कोणाला! उकाड्यापासून सुटका करण्यासाठी कुत्र्यांनी केला अनोखा जुगाड! बघून तुम्हीही हैराण व्हाल;व्हिडीओ पहा…

0 1,034

उन्हाळा सुरु झाला असून देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मानव प्राण्यांप्रमाणेच पशूंनाही उन्हाची काहिली त्रस्त करू लागली आहे.

 

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी माणसाला अनेक साधने वापरता येत असली तरी पशुपक्ष्यांना मात्र कोणताच आधार नसतो. अशातच याच उष्णतेला कंटाळून एका कुत्र्यानं भन्नाट जुगाड केला आहे. या जुगाडाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु असून व्हिडीओही जोरदार व्हायरल झाला आहे.

काही कुत्रे थंड पाण्याच्या भांड्यात डुबकी मारत आहेत. उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी तेही थंड पाण्यात उतरुन स्वतःला थंड करत आहे. व्हिडीओमध्ये दोन पाण्याचे भांडे दिसत आहेत. ज्यामध्ये काही कुत्रे एका मागून एक उतरत गरमीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. लहान बाळांना जसं पाण्यात बसायला आवडतं त्याचप्रमाणे हे दोन कुत्रे पाण्यात निवांत बसले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी अनेक गमतीशीर प्रतिक्रिया यावर देत आहेत. तर, कधी पाऊस सुरु होणार याची वाट माणसांप्रमाणे प्राणीही पाहत आहेत अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.