थरारक: लग्नात वरमाला घालताना नवरदेवाने ठेवली विचित्र अट! संतापलेल्या नवरीने केलं असं काही; व्हिडीओ पहा…
हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरीही हुंडा घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. लग्न म्हटलं की, गडबड गोंधळ होतोच. कधी डीजेवर नाचण्यावरून लग्नात वाद होतो. तर कधी नवरदेवाच्या हट्टामुळे याचा मनस्ताप मात्र, वऱ्हाडी मंडळींना सहन करावा लागतो.
असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधू समोर आला आहे. लग्नाच्या मध्येच नवरदेवाने अशी डिमांड केली की वधूपक्ष पुरता हादरला. यानंतर मात्र नवरदेवाला डिमांड करणं चांगलंच महागात पडले. कारण ही मागणी एकुन नवरदेवाला चक्क झाडाला बांधून ठेवण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात नेलं आहे. बुधवारी रात्री जौनपूर येथून मांधाता भागातील हरखपूर येथे हे वऱ्हाड आलं होते. दरम्यान अचानक वराने हुंड्याची मागणी सुरू केली. यामुळे वधूच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला लोकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ठाम राहिल्याने संतप्त कुटुंबीयांनी नवरदेवाला झाडाला बांधले. यासोबतच वराचे अनेक नातेवाईक आणि वऱ्हाड्यांनाही कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे लग्नस्थळी गोंधळ उडाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सोबत घेतले. पोलीस ठाण्यात दिवसभर यासंदर्भात गोंधळ सुरू राहिला. मात्र निकाल लागला नाही. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रतापगढ़
दहेज मांगने पर दूल्हे को पेड़ से बांधा
दूल्हे के रिश्तेदारों को भी बनाया गया बंधक
जयमाल के बाद दहेज को लेकर हुआ विवाद
जौनपुर जिले के सुजानगंज से आई थी बारात
दूल्हे को पेड़ से बांधने का वीडियो हुआ वायरल
मांधाता थाना के हरखपुर गांव का बताया गया वीडियो pic.twitter.com/CFZ4llGxgp
— Adv Karuna sharma (@asiamanchnews) June 15, 2023