बदलेल्या जीवनशैलीनुसार माणसांने बरीच प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान व विकसित गोष्टी आणून त्यांने चुलीसारख्या गोष्टींचे गॅसमध्ये रुपातंर केले. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा पर्याय माणसांने शोधून काढला आहे.परंतु, गेल्या काही काळापासून शहरातील लोकांना गावाकडच्या जेवणाची चव आवडू लागली आहे. चुलीवर बनवलेल्या पिठल भाकरीची चव काही औरचं… झणझणीत रस्सा व भातासोबत शहरातील माणसं चवीने या गोष्टी खातात.
मात्र कामानिमित्त जे भारताबाहेर राहतात त्यांना मनात आलं आणि गाव गाठलं असं करता येत नाही, मग बाहेरच्या देशात ते सुद्धा आपलं भारतातील पारंपारिक पद्धतीनं केलेलं जेवण मिस करतात. मात्र आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये सासू सुना चक्क युरोपमध्ये चुलीवर स्वयंपाक करत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपले चुलीवरचे जेवण तेही युरोपमध्ये या भारतीय सासू सूना करत आहेत. या दोघींनीही आपली पंरपरा युरोपात जपण्याचा प्रयत्न केला आहे.