आपल्या लग्नाबद्दल प्रत्येक कपलने वेगवेगळी स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या ड्रेस आणि ज्वेलरीपासून व्हेन्यू डेकोरेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे ते विशेष लक्ष देतात. नवरीच्या एन्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आपली एन्ट्री अतिशय खास असावी अशी प्रत्येक नवरीची इच्छा असते. अनेकदा नवरीची धमाकेदार एन्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.
लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. सध्या नवरीच्या एन्ट्रीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये नवरदेवाने बायकोला चक्क जेसीबीवर बसवून आणलं मांडवात आणले आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ रांचीचा आहे. जिथे कृष्णा महतो नावाचा एक व्यक्ती फुलांनी सजवलेल्या जेसीबीमध्ये आपल्या वधूला घेऊन जाताना दिसत आहे. नवरदेव कृष्णा फुलांच्या सजावटीचे काम करतो आणि त्याने आपले लग्न वेगळे आणि लक्षात राहण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली असल्याचं तो सांगतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेसीबीवर गाद्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यावर नवरदेव कृष्णा आणि त्याची बायको दोघेही बसलेले दिसत आहेत.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ काहीच सेकंदाचा आहे. मात्र नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत असून व्हिडिओ शेअरही करत आहेत.
🚨 जे बात 🚨
रांची में दुल्हनिया को लेने JCB से पंहुचा दूल्हा।दुल्हन की JCB से विदाई का वीडियो।#Ranchi #Jharkhand pic.twitter.com/IXP06OnJmP— साइको किलर (@Jihad_Killer_) June 14, 2023