माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी शहरामध्ये वीज बोर्डा जवळ झालेल्या अपघातामध्ये दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. सदरचा अपघात हा आज दिनांक १६ रोजी सकाळी ११.०० च्या सुमारास झाला असून यामध्ये चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिघंची कडून चारचाकी गाडी ही आटपाडी कडे येत होती. तर आटपाडी हून दिघंची कडे दुचाकी वरून युवक निघाले होते. यावेळी दिघंची कडून दुचाकी व चारचाकी वाहन येत होते. यामध्ये तीनही वाहनांचा विचित्र अपघात झाला.
यामध्ये दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी युवक बोंबेवाडी गावाचे असल्याचे समजले आहे. अपघातामध्ये दोन चाकी व चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. (बातमी अपडेट होते आहे.)