Latest Marathi News

BREAKING NEWS

 

नेलकरंजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी आमरण उपोषणाचा इशारा

0 616

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या नाथा घाडगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, नेलकरंजी येथे सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने सन २०१७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी आंदोलन झाले होते. त्यावेळी तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यात चर्चा घडवून आणली.
यामध्ये उद्यानाच्या नावाचा बोर्ड लावणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जागेची ग्रामपंचायत सदरी त्यांची नोंद करणे असे सर्वानुमते ठरले होते. परंतु गेली पाच वर्ष झाले, ग्रामसेवक व सरपंच हे टाळाटाळ करत आहेत.

त्यामुळे एक महिन्याच्या आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी सकारात्मक पावले उचलली गेली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा नाथा घाडगे यांनी दिला असून निवेदनाच्या प्रति गटविकास अधिकारी आटपाडी, तहसीलदार आटपाडी, पोलीस निरीक्षक आटपाडी, प्रांताधिकारी विटा, डीवायएसपी विटा, पोलीस अधीक्षक सांगली, मुख्यकार्यकारी अधिकारी सांगली यांना देण्यात आलेल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.