Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी : खोटा धनादेश देणाऱ्याला एक महिना तुरुंगवास व दंडाची शिक्षा

0 2,497

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी न्यायालयाचे न्यायाधीश मा. विनायक पाटील यांनी बँकेस खोटा धनादेश देणाऱ्या आरोपीला एक महिना तुरुंगवास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, खोटा धनादेश देणा-याला एक आटपाडी येथील सांगोला अर्बन को. ऑप. बॅक शाखेतील शाखाधिकारी निर्मलकुमार नानासो जुगदर यांनी ॲड. चेतन व्ही. जाधव यांचेमार्फत चंद्रकांत आकाराम ऐवळे-पाटील रा.सोनारसिथ्दनगर, पुजारवाडी, आटपाडी याचे विरुद्ध कलम 138 अन्वये आट्पाडी न्यायालयात केस दाखल केली होती.

आरोपी चंद्कांरत आकाराम ऐवळे-पाटील यांनी फिर्यादी सांगोला अर्बन को. ऑप. बॅक शाखा- आटपाडी या बँकेस रक्कम रु. २९०००/- चा धनादेश दिलेला होता. सदरचा धनादेश वटला नाही म्हणून फिर्यादी सांगोला अर्बन को. ऑप. बॅक शाखा- आटपाडी शाखेतील शाखाधिकारी निर्मलकुमार नानासो जुगदर यांनी ॲड. चेतन जाधव यांचेमार्फत केस दाखल केलेली होती.

न्यायालयाने फिर्यादी बँक व आरोपी यांचे सर्व पुरावे पाहून यातील आरोपी चंद्रकांत आकाराम ऐवळे-पाटील याला एक महिना तुरुंगवासाची व रककम रुपये ३२७०० रुपये दंड व दंड न भरलेस सात दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादी बँकेला रक्‍कम दोन हजार खर्च देण्याचे आदेश पारीत केते. फिर्यादी बँकेतर्फे ॲड.चेतन जाधव यांनी काम पहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.