मेष: शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल. कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. कामाची कदर केली जाईल.
वृषभ: प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे – सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. सौख्य प्राप्त होईल.
मिथुन: आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. खर्च जास्त होईल.
कर्क: अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. संतती व पत्नी यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील.
सिंह: आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. वरिष्ठांची मर्जी राहील. सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. घर, जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील.
कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ: नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
वृश्चिक: स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज – मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे खूप आनंदी राहाल. मान – सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने आपले मन प्रफुल्लित होईल.
धनु: आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मित्र – मैत्रिणींचा सहवास घडेल.
मकर: कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल. संतती विषयी चिंतीत व्हाल. कुटुंबातील थोरांची प्रकृती बिघडू शकते. शारीरिक दृष्टया अस्वस्थ राहाल.
कुंभ: आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर – संपत्ती किंवा वाहन कागदपत्र बनवताना सावध राहावे. महिलांचा सौंदर्य प्रसाधने, वस्त्र, आभूषणे यांच्या खरेदीसाठी खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.
मीन: आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. भावंडांकडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान – सन्मान होतील. आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल. आणखी वाचा
(टीप : फक्त वाचका पर्यंत माहिती पोहचविण्याचे काम केले जाते. यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही)