माणदेश एकस्र्पेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिघंची घनचक्र मळा येथील विश्वनाथ किसन चव्हाण हे दिनांक १४ रोजी रात्रीच्या सुमारास घराला कुलूप लावून ते घराच्या टेरेसवर झोपले होते. याचा फायदा चोरट्यांनी घेत कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत घरातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा नेकलेस, कानातील सोन्याचे फुले व नथ तसेच रोख ३५,०००/- असे एकूण १,१५,५००/- रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
याबाबत विश्वनाथ चव्हाण यांनी आटपाडी पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.