Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी : विवाहित महिलेचा मारहाण करून विनयभंग : आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

0 2,091

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील विवाहित महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, नेलकरंजी येथे गट नंबर ९१९ मध्ये चंद्राबाई दामोदर माळी यांच्या घराचे सुरु असताना यातील फिर्यादी यांनी या गटाचा दावा दिवाणी न्यायालयात चालू असून या ठिकाणी बांधकाम करू नका असे म्हणाले असता, यातील आरोपी ठेकेदार विक्रम केरू पवार व परीस सरकार रा. दोघेहे विटा यांनी फिर्यादी हिला मारहाण करून विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांचे वडील व बहीण व मुलगा यांना ही आरोपींनी मारहाण करत जीवंत ठरवणार नाही अशी धमकी दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध कलम ३५४, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.