माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे इयत्ता पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होणार असून शाळेमध्ये आज दाखल होणाऱ्या नवागतांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आटपाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांनी दिली.
यावेळी बोलताना दत्तात्रय मोरे म्हणाले, आज आटपाडी तालुक्यातील जिल्हा जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा आहेत. या सर्व शाळामध्ये आज दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
तसेच सर्व विद्यार्थांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश व पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात येणार आहेत. सर्व शाळामध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार असून शाळा पूर्व मेळावे देखील घेण्यात आले आहेत.
.